माथेरान ची राणी आजपासून पुन्हा धावणार | Matheran Queen Is Back | Interesting Videos

2021-09-13 16

शतक महोत्सव साजरा करणारी, जुन्या काळाची आठवण ताजी करणारी, आणि गेले दीड वर्ष बंद असलेली नेरळ- माथेरान मिनीट्रेन आज 30 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रवास्यांच्या दिमतीला हजर होणार आहे . मे 2016 रोजी मध्ये एकाच आठवड्यात दोन वेळा रुळावरून घसरलेली मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. नंतर मध्य रेल्वेच्या चौकशीत ब्रेक प्रणाली निकामी झाल्याचे आढळून आले. आता नव्याने बदल करण्यात आलेली ब्रेक प्रणालीने बंद करण्यात आलेली सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहे. सुरवातीला अमर लॉज ते माथेरान दरम्यान हि शटल सेवा सुरु करण्यात येणार आहे. शटल सेवेच्या किती फेऱ्या होतील ह्याबाबत कोणतीही माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेली नाही. चाचणीसाठी 1400 आणि 402 हि इंजिने आणि 6 प्रवासी डबे जोडण्यात आले आहे. ह्यानिमित्ताने पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरु होणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires